महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा चांदीचा मुकुटही गहाळ ; महंतांनीच चोरल्याचा संशय; सात जणांवर गुन्हा दाखल

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन, दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकारांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गायब झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा चांदीचा मुकुटही गहाळ ; महंतांनीच चोरल्याचा संशय; सात जणांवर गुन्हा दाखल
PM
Published on

धाराशीव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा मुकूट गहाळ झाला आहे. मंदिर संस्थानने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २०११ सालापूर्वी चांदीचा मुकुट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे असा दुर्मिळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून गायब झाला आहे.

तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याचे प्रकरण ताजे असताना तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले. सोमनाथ माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. ७ मधील रेशमासह ४३ भार वजनाचा चांदीचा मुकुट खजिन्यातून गायब असल्याचे म्हटले आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन, दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकारांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गायब झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार जण तुळजाभवानीचे महंत आहेत. या चार महंतांपैकी तीन महंत मयत असून महंत चिलोजीबुवा हे एकमेव संशयीत सध्या हयात आहेत. तत्कालीन सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तेही आजघडीला हयात नाहीत. एक अज्ञात आरोपी असल्याचेही तक्रारीत नमुद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in