तुळजापुरात भीषण दुर्घटना! विहिरीतील मोटार काढताना शॉक लागला; बाप-लेकासह चौघांचा मृत्यू

विहिरीत पडलेली मोटार काढण्याचे काम क्रेनने सुरू होते. तेव्हा क्रेनचा वरील भाग महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनीला लागला. या कामात सहभागी असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुळजापूर तालुक्यातील मृतांमध्ये वडील, मुलगा आणि दोन मजुरांचा समावेश आहे.
तुळजापुरात भीषण दुर्घटना! विहिरीतील मोटार काढताना शॉक लागला; बाप-लेकासह चौघांचा मृत्यू
Published on

तुळजापूर : विहिरीत पडलेली मोटार काढण्याचे काम क्रेनने सुरू होते. तेव्हा क्रेनचा वरील भाग महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनीला लागला. या कामात सहभागी असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुळजापूर तालुक्यातील मृतांमध्ये वडील, मुलगा आणि दोन मजुरांचा समावेश आहे.

केशेगाव गणपत साखरे यांच्या शेतातील विहिरीतील मोटार काढण्याचे काम सुरू होते. क्रेनच्या सहाय्याने ही मोटार बाहेर काढली जाताना क्रेनचा वरील भाग महावितरणच्या उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाल्याने क्रेनमध्ये करंट उतरला. त्यात, मोटार काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दुर्घटनेतील सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत आहेत.

या दुर्घटनेची मृतांची नावे : कासिम कोंडिबा फुलारी, रतन कासिम फुलारी, रामलिंग नागनाथ साखरे, नागनाथ साखरे.

logo
marathi.freepressjournal.in