शरद पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असे राष्ट्रवादीच्या नवीन गटाचे नामकरण केले आहे.
शरद पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्हे दिले आहे. निवडणूक जवळ आल्याने आम्हाला लवकरात लवकर पक्ष चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले होते. त्यामुळे शरद पवार यांनी नवीन चिन्हाची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असे राष्ट्रवादीच्या नवीन गटाचे नामकरण केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in