Twitter war: घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी ते लगे रहो भाईजान... म्हात्रेंविरुद्ध आव्हाड जुंपली

रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे
Sheetal mhatre
Sheetal mhatre

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. या व्हिडिओवरून गंभीर आरोपही करण्यात आले होते. या संदर्भात दोन्ही बाजूंनी दावे आणि प्रतिदावे करण्यात आले आहेत. यावरून राजकारण तापले असताना शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड यांच्यात वेगळेच 'ट्विटर वॉर' सुरू झाल्याचे दिसत आहे. रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. 25 मार्च रोजी शीतल म्हात्रे यांनी "ही तुमची हिंदुत्वाची विचारधारा का?" असे कॅप्शन देत उद्धव ठाकरे गटाच्या बॅनरचा फोटो ट्विट केला होता. हा बॅनर उर्दू भाषेत छापण्यात आला होता. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? उध्वस्त सेना..खांग्रेसची चमचेगिरी”, असे शीतल म्हात्रे यांनी ट्विट केले होते.

उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेशी संबंधित हे बॅनर होते. यावर प्रतिउत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला एक बॅनर आव्हाड यांनी ट्विट केला, व “याच्यावर बोला ताई. खास तुमच्या माहितीसाठी. कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”, असे कॅप्शन दिले.

या ट्विटला पुन्हा शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिले. “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्वीट चांगलंच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असे ट्विट शीतल म्हात्रे यांनी केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून, “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारं कृत्य मी करत नाही. आठवतंय ना? काय दे ढुं***, काय तो दांडा.. धूर कुठून निघाला?” असा प्रश्न विचारण्यात आला.

दरम्यान शीतल म्हात्रे यांचे ट्विट आणि जितेंद्र आव्हा यांच्या प्रत्युत्तरानंतर पुन्हा एकदा हेच झाले. “पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी.लगे रहो भाईजान” असे त्यांनी म्हंटल्यानंतर “त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. एकीकडे अन्य मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापले असतानाच जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात वेगळेच ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in