विधानसभेसाठी मनसेचे दोन उमेदवार जाहीर; शिवडीतून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे रिंगणात

मुंबईतील शिवडी आणि पंढरपूर मंगळवेढा या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी मनसेने सोमवारी आपले उमेदवार जाहीर केले.
Two MNS candidates announced for Assembl
Facebook,X
Published on

सोलापूर : अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारा मनसे पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत स्व:बळावर लढणार हे आता निश्चित झाले आहे. मुंबईतील शिवडी आणि पंढरपूर मंगळवेढा या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी मनसेने सोमवारी आपले उमेदवार जाहीर केले. शिवडीतून माजी आमदार बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: या दोन उमेदवारांची घोषणा केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते सोलापूर येथे होते. सोलापूर शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत पत्रक जारी केल्याचे मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आली असून राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीला वेग आला आहे. मनसेने मात्र जोर करत आपले दोन उमेदवारी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत स्व:बळावर लढणार असल्याचा नारा राज ठाकरे यांनी आधीच दिला होता. लोकसभा निवडणुकीत मात्र मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in