Karad : दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

पाटण तालुक्यातील गाडखोप येथील दोन शाळकरी मुलांचा कोयना धरणाच्या भिंतीलगत असलेल्या कोयना नदीपात्रात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आर्यन अनिल कदम (१५) आणि करण दाजीबा कदम (१३) अशी मृत मुलांची नावे असून, या दुर्घटनेमुळे गाडखोप गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

कराड : पाटण तालुक्यातील गाडखोप येथील दोन शाळकरी मुलांचा कोयना धरणाच्या भिंतीलगत असलेल्या कोयना नदीपात्रात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आर्यन अनिल कदम (१५) आणि करण दाजीबा कदम (१३) अशी मृत मुलांची नावे असून, या दुर्घटनेमुळे गाडखोप गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन आणि करण हे दोघे मंगळवारी दुपारी आपल्या नदीपात्रात भिंतीलगतच्या पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर मित्रांसोबत कोयना धरणाच्या स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. मृतदेह

शवविच्छेदनासाठी पाटण ग्रामीण दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा याप्रकरणी मयत आर्यनचे वडील अनिल तुकाराम कदम (४०) यांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार गुरव अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in