प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना होणार सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा; महावितरणची योजना

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना होणार सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा; महावितरणची योजना
Published on

मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे. त्यानुसार निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यांत सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आदर्शगाव मान्याचीवाडी या गावाला लवकरच शंभर टक्के सौर उर्जेव्दारे विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे हे गाव लवकरच सौरग्राम म्हणून नावलौकीकाला येणार आहे.

निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. तर पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौरऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in