अमरावतीत बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू; २५ प्रवासी जखमी

मध्य प्रदेशच्या तुकईथडला जाणाऱ्या परतवाडा आगाराच्या बसला सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. जवाहर कुंड येथे घाट वळणावर असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस ३० फूट खोल दरीत कोसळली.
अमरावतीत बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू; २५ प्रवासी जखमी

अमरावती : अमरावतीहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या एका बसला झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर बसमधील २५ पेक्षा अधिक प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत.

मध्य प्रदेशच्या तुकईथडला जाणाऱ्या परतवाडा आगाराच्या बसला सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. जवाहर कुंड येथे घाट वळणावर असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. इंदू समाधान गंत्रे (६५), आणि ललिता चिमोटे (३०) अशी अपघातात दगावलेल्या महिलांची नावे आहेत. जखमींना सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in