
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात शाहू खासबाग मैदानाची मोठी भिंत आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली .या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला अडकलेल्या होत्या. त्यापैकी एका महिलेला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिकेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या ठिकाणी ढिगारा हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने ही भिंत कोसळली. या ठिकाणी एका चार चाकी वाहनाचेदेखील मोठ नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.