"आयत्या प्रकल्पांवर उबाठा, तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते..."; भाजप, ठाकरे गटात ट्विटवॉर सुरुच

उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा संपल्यानंतर सपत्नीक वंदे भारत एक्स्प्रेसने खेड ते मुंबई प्रवास केला. या प्रवासाची छायाचित्रे समोर आल्यानंतर भाजपने एक ट्विट करत...
"आयत्या प्रकल्पांवर उबाठा, तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते..."; भाजप, ठाकरे गटात  ट्विटवॉर सुरुच

कोकण दौरा संपल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि सहकाऱ्यांसोबत वंदे भारत एक्स्प्रेसने परतीचा प्रवास केला. वंदे भारत ट्रेन हा प्रोजेक्ट भाजप काळात झाला असल्याने हिच तर 'मोदी की गॅरंटी' आणि 'विरोधकही लाभार्थी', असे म्हणत भाजपने ठाकरे यांचा प्रवासादरम्यानचा फोटो ट्विट केला होता. ठाकरेंकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावर आता भाजपने "आयत्या प्रकल्पांवर उबाठा", असे म्हणत पलटवार केला आहे.

"आयत्या प्रकल्पांवर उबाठा घरात बसून बाबरी ढाच्या उध्वस्त केल्याचे श्रेय लाटल्या नंतर प्रस्तुत आहे "MTHL अटल सेतू" आणि कोस्टल रोड. तुम्ही फक्तं आम्ही केलेल्या कामांची श्रेय लाटू शकता तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते मातोश्री २ या पलीकडे नाही हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे", असे भाजपने म्हटले आहे. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत 'एक्स'हँडलवरुन ठाकरे गटाने केलेले ट्विट शेअर करत प्रत्युत्तर देण्यात आले.

काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा संपल्यानंतर सपत्नीक वंदे भारत एक्स्प्रेसने खेड ते मुंबई प्रवास केला. या प्रवासाची छायाचित्रे समोर आल्यानंतर भाजपने एक ट्विट करत त्यात, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार... मोदी सरकार!, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचले. तसेच, हिच मोदी गॅरंटी असून कुठे आहे विकास? असे ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते. लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार हे नक्की, असे म्हणत मोदी है तौ मुमकीन है आणि विरोधकही लाभार्थी असे हॅशटॅग वापरत ठाकरे यांना टोला लगावला.

कितीही घाई केलीत तरी...

यावर ठाकरे गटानेही "कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडीट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्धाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्धाटनाची घाई चाललीये. पण तुम्ही कितीही घाई केलीत तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडीट मिळणार नाहीच!", असे म्हणत प्रत्युत्तर दिले. दरम्यान, ठाकरे गटाने दिलेल्या उत्तरावर आता भाजपने पुन्हा पलटवार केल्याने शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात ट्विटवॉर सुरु झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in