Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांचे रायगडावर आक्रोश आंदोलन; म्हणाले, तलवार घेऊन अपमान करणाऱ्यांची...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा आक्रोश
Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांचे रायगडावर आक्रोश आंदोलन; म्हणाले, तलवार घेऊन अपमान करणाऱ्यांची...

भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानावरून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने चांगलेच आक्रमक झालेले आहेत. माध्यमांसमोर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, "असं वाटतेय की तलवार घेऊन एकेकाची मुंडकी छाटून टाकावी, एवढा संताप आलाय आता मला. तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का ? शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते." अशा भाषेत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ते उद्या रायगडावर आक्रोश आंदोलन करणार आहेत.

उदयनराजे भोसले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. मी माझ्या 'उदयन' या नावापुढे 'राजे' लावतो कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्हाला सन्मान मिळाला. त्यामुळे हा केवळ त्यांचाच अपमान नाही, अनेक महापुरुषांची देखील काही लोक अपमान करत आहेत. हा अपमान मी कदापी सहन करु शकत नाही आणि का करावा?" असा सवाल केला आहे. "मी आज रायगडला जाणार आहे. उद्या शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथे सगळं बोलेन." असा इशारा दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in