...त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - उदयनराजे

छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासारख्या विकृतांना गोळ्या घातल्या पाहिजेत.
...त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - उदयनराजे
Published on

नवी दिल्ली : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासारख्या विकृतांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. राहुल सोलापूरकर यांनी अतिशय विकृत विधान केले असून त्याची जीभ हासडली पाहिजे आणि महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे, असेही भोसले म्हणाले. दरम्यान, आपल्या विधानावर चौफेर टीका झाल्यानतर सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

सोलापूरकर काय म्हणाले

राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरच्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत म्हटले होते की, महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते, महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे. गोष्टीरुपात करताना ते रंजक करुन सांगितले गेले, त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही, असे सोलापूरकर यांनी म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in