छ. उदयनराजे भोसले-कपिल देव यांची विमान प्रवासात भेट; १९८३ च्या वर्ल्ड कपला दिला उजाळा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विख्यात जलदगती गोलंदाज कपिलदेव निखंज यांची विमान प्रवासादरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये १९८३ च्या वर्ल्ड कपसह क्रिकेटविषयीच्या चर्चा रंगल्या.
छ. उदयनराजे भोसले-कपिल देव यांची विमान प्रवासात भेट; १९८३ च्या वर्ल्ड कपला दिला उजाळा
Published on

कराड : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विख्यात जलदगती गोलंदाज कपिलदेव निखंज यांची विमान प्रवासादरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये १९८३ च्या वर्ल्ड कपसह क्रिकेटविषयीच्या चर्चा रंगल्या.

खा. उदयनराजे भोसले हे छ. दमयंतीराजे भोसले यांच्यासह नुकतेच नवी दिल्लीला गेले असताना त्यांची भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव निखंज यांची विमान प्रवासादरम्यान भेट झाली.

या भेटीदरम्यान दोघांमध्ये क्रिकेटविषयक चर्चा रंगली. चर्चेत उदयनराजे यांनी सन १९८३ साली झिम्बाब्वेविरुद्ध कपिलदेव यांनी खेळलेल्या अविस्मरणीय नाबाद १७५ धावांची खेळी आठवून विशेष उल्लेख केला. यावेळी दमयंतीराजे भोसले यांनीही चर्चेत सहभाग घेतला होता.

‘क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देईन’

मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी सातारा आणि महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात लवकरच विशेष बैठक आयोजित झाल्यास मी नक्कीच योगदान देईन, असे आश्वासन कपिलदेव यांनी खा. उदयनराजे भोसले यांना दिले. या चर्चेत श्री. छ. दमयंतीराजे भोसले याही सहभागी झाल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in