"एक विधानसभा ५ लोकांना शब्द, कसा पाळणार उद्धवजी..." छ.संभाजीनगरमध्ये ठाकरेंना डिवचलं, 'तो' बॅनर चर्चेत

उद्धव ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान शहरात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. परंतु शहरातील एका बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधलं.
"एक विधानसभा ५ लोकांना शब्द, कसा पाळणार उद्धवजी..." छ.संभाजीनगरमध्ये ठाकरेंना डिवचलं, 'तो' बॅनर चर्चेत

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान शहरात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. परंतु शहरातील एका बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधलं. कधी तरी शब्द पाळणार का, उद्धवजी? असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.

बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान एका बॅनरची चर्चा होत आहे. या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीनं लावलेल्या या बॅनरमध्ये खालील मजकूर लिहीण्यात आलाय.

'कधी तरी शब्द पाळणार का, उद्धवजी

लोकसभा निवडणूक काढण्यासाठी दिलेल्या शब्द पाळणार का? उद्धवजी

एक विधानसभा ५ लोकांना शब्द कसा पाळणार उद्धवजी'

छ. संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, राजू शिंदे ठाकरे गटात-

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंसह भाजपच्या ५ नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in