उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे दाखल

सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोन्ही नेत्यांसोबत संजय राऊतही उपस्थित
उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे दाखल

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधानांच्या मुद्द्यांवरून मतभेद पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीची एकजूट तर मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीत मोठी घडामोड घडत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षनेते उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओक येथे दाखल झाले.

सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोन्ही नेत्यांसोबत संजय राऊतही उपस्थित आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांची भेट पूर्वनियोजित असल्याचे बोलले जात आहे. काल संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय.बी.ची चव्हाण सेंटरमध्ये बैठक घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in