राजकारणातील भोंदू भक्तांवरही कारवाई करा! उद्धव ठाकरे यांची मागणी

कर्तृत्वशून्य आणि भाकड नेत्यांनाच भोंदूगिरीचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्याचे पालन करणारेच भोंदूबाबाच्या नादी लागणार असतील तर अशा बाबांसोबत राजकारणात असलेल्या त्यांच्या भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कर्तृत्वशून्य आणि भाकड नेत्यांनाच भोंदूगिरीचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्याचे पालन करणारेच भोंदूबाबाच्या नादी लागणार असतील तर अशा बाबांसोबत राजकारणात असलेल्या त्यांच्या भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली. हा मुद्दा मोठा असून तो सत्ताधारी आमदारांशी संबंधित आहे. तेव्हा या सगळ्यांच्या पापावर पांघरून घालणारे खाते मुख्यमंत्र्यांनी सुरू करावे आणि त्यांनी ते खाते स्वतःकडेच ठेवावे, असा सणसणीत टोलाही ठाकरे यांनी लगावला.

शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे सुरू होणाऱ्या एक्स्पोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभउद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी शिवसेना भवनात झाला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या वृत्तीवर टीका केली. राज्यातील राजकारण अजून किती खालच्या पातळीवर नेणार आहात ? असा सवाल करत ठाकरे म्हणाले, आम्ही लॉजिस्टिक विषय सुरू करून महाराष्ट्राला विज्ञानात, तंत्रज्ञानात पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात.

लिंबाचा रस येथून तेथून कसा न्यायचा हा विषय लॉजिस्टीकमध्ये येईल. पण त्याला टाचण्या मारणे हे काही आमचे काम नाही आहे. दुर्दैवाने एपस्टीन फाइलवरून लक्ष उडावे म्हणून महाराष्ट्रात आता नवीन विषय सुरू होता कामा नये.

अनेक नेते आणि पुढारी यांचे - भोंदूबाबासोबतचे फोटो उघड झाले आहेत. त्यामुळे कर्तृत्वशून्य नेत्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. - भाकड आणि भोंदू नेते त्यांच्यात कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने काही करू शकत नाही तेच लोक अशा भोंदूगिरीचा आसरा घेत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्काबुक्की आणि झोंबाझोंबी झाली. यामध्ये मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले. याकडे लक्ष वेधले असता, आता त्यांच्या लक्षात येईल की, रेड्याप्रमाणे लोकशाही देखील कापली जाते, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.

पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या !

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अशोक खरातच्या निवासस्थानाला नाशिक जिल्ह्यातील कालव्यातून पाणी सोडल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, पाणी वळवले असेल तर पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या. पण ते समजल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in