निवडणूक आयोगाचा निकाल एकतर्फी ; उद्धव ठाकरे आक्रमक

निवडणूक आयोग रद्द करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला 'शिवसेना' नाव आणि पक्षाचे चिन्ह 'धनुष्यबाण' अधिकृतपणे दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकतर्फी असून आपण तो मानायला तयार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवाय निवडणूक आयोग रद्द करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "हा वाद सुरू झाला तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. सदस्य संख्या दाखवा, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर चार-सहा महिने मधे निघून गेले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन शपथपत्रे तपासली. त्यात काहीही खोटे नाही, सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, असा अहवाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला आहे.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार आम्ही शपथपत्रे दाखल केली. पाऊस पडत असताना आम्ही सर्व प्रतिज्ञापत्रे सुरक्षितपणे आयोगाकडे नेली. आमच्याकडे रद्दी जमा झाली होती, त्यामुळे आम्ही ही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे जमा केली नाहीत. तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, असे निवडणूक आयोगानेच सांगितले. तसेच सभासद संख्या दाखवावी लागेल. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लाखोंनी नोंदणी केल्यानंतर अचानक निवडणूक आयोगाने शपथपत्रे चालणार नाहीत, असे सांगायला सुरुवात केली. तुमच्या पक्षाने निवडून दिलेल्या बहुसंख्य सदस्यांनी ते ठरवले जाईल. मात्र संबंधित आमदार पात्र की अपात्र हे आधी ठरवावे. जर तुम्हाला हेच करायचे असेल तर आम्हाला इतके कष्ट का करायला लावले? 

या सर्व घटना पाहिल्यानंतर सध्याचा निवडणूक आयोग रद्द करून निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी, ही शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मी मानायला तयार नाही. हा सरळसरळ अन्याय आहे. परवा अमित शहा महाराष्ट्रात आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या युतीला भाजप-शिवसेना युती म्हटले, पण ती युती नाही. हे चोरलेले धनुष्य बाण आहे. असेही ते म्हणाले. 

logo
marathi.freepressjournal.in