Uddhav Thacekray : "तुम्ही नाव चोराल, पण... "; मालेगावच्या भाषणात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज मालेगावच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटाचा समाचार घेतला
Uddhav Thacekray : "तुम्ही नाव चोराल, पण... "; मालेगावच्या भाषणात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज मालेगावमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांनी जाहीर सभा घेतली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटाचाही समाचार घेतला. ते म्हणाले, "शिवसेनेचे नाव चोरले, धनुष्यबाण चोरले, पण पक्षाशी जोडलेली जिवाभावाची माणसे कशी चोरू शकाल?" असा सवाल त्यांनी यावेळी केला. "हिंमत असेल तर आज निवडणूक लावा, तुम्ही मोदींच्या नावाने लढा आणि मी बाळासाहेबांच्या नावाने लढतो." असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, "प्रेम करणारी माणसे चोरता येत नाहीत. प्रेम करणारी माणसे विकत घेता येत नाहीत. मुख्यमंत्रीपद येत-जात राहील पण हे प्रेम कायम राहणार आहे. गद्दाराच्या नशिबामध्ये हे प्रेम नाही." असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. पुढे ते म्हणाले की, "भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे हे त्यांचे काम. मोदी म्हणजे भारत नव्हे, तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसून अटक करतात. परदेशातून भारतात आणून तुम्ही गुन्हे दाखल करता. पण, आमचे संस्कार म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही." असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in