उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत, अशी बोचरी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात आहेत, असंही ते म्हणाले. याशिवाय प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊतांनी विशालगडाच्या अतिक्रमणावर बोललं पाहिजे, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना...
मनसे नेते प्रकाश महाजन एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. मुस्लिम त्यांच्या आणि ते मुस्लिमांच्या इतके प्रेमात पडले की, शंकराचार्यांना घरी आणून त्यांनी पाय धुतले, तरी हिंदू त्यांच्याकडे वळतील असं वाटत नाही. संजय राऊतांनी विशालगडाच्या अतिक्रमणावर बोलावं. सकाळचा माईक बंद का करता, त्यावर बोलले पाहिजे."
गजापूर गावात नवीन मुस्लीम वस्ती कुठून उभी राहते?
ते पुढं म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील अथवा राज्याबाहेरचा कुठलाही किल्ला हा तीर्थक्षेत्र आहे. त्यावर अतिक्रमण होता कामा नये. विशालगडावर जुन्या जागांवर अतिक्रमण झालंय आणि अतिक्रमण करणाऱ्याची बाजू घेणे म्हणजे तुम्ही बेकायदेशीरपणाला पाठिंबा देताय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांची समाधी कुठे हे कुणाला माहिती आहे का? त्यांची समाधी किती विपन्न अवस्थेत आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी विशालगडावर सती गेल्या. काहींना फक्त मतांचे राजकारण करायचे आहे. गजापूर गावात नवीन मुस्लीम वस्ती कुठून उभी राहते? यासिन भटकळ तिथे येऊन राहतो कसा? या गोष्टीचे तुम्ही समर्थन करताय?"