"गद्दारी अन् घराणेशाही लोकसभेतच नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार", उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. कारण, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधारायची आहे, मीही सुधारणार आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला.
"गद्दारी अन् घराणेशाही लोकसभेतच नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार", उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी कंबर कसली आहे. ठाकरे यांनी अंबरनाथपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरु केला. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटाला धारेवर धरले. "आता गद्दरांची घराणेशाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्राणप्रिय वाटू लागली आहे. पण, कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही गाडायची आहे. गद्दारी आणि घराणेशाही लोकसभेतच नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार आहे", असे ठाकरे यांनी म्हटले.

काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. कारण, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधारायची आहे, मीही सुधारणार आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला. गद्दारांची घराणेशाही संपवल्याशिवाय खरा शिवसैनिक गप्प बसणार नाही. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी घराणेशाहीवर बोलू नये. ते आमच्यावर बोलले असतील तर आम्ही देखील त्यांच्या घरावर बोलू, असे म्हणत त्यांनी थेट मोदींवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान प्रचंड गोड बोलत असून त्यांना निडवणुकीसाठी महाराष्ट्र लागतो आणि व्यवसायासाठी गुजरात असेही ते म्हणाले.

राम मंदिराची पूजा ही राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून त्यासाठी राष्ट्रपतींच्या हातून पूजा करणे गरजेचे होते. मात्र, राम मंदिराच्या आडून काही लोक निवडणुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in