अखेर दोन्ही गटाला नावे मिळाली, उद्धव ठाकरे यांच्या हाती 'मशाल'

तिसरा पर्याय म्हणून मशाल चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला तीन नवीन चिन्हे देण्याची सूचना करण्यात आली
अखेर दोन्ही गटाला नावे मिळाली, उद्धव ठाकरे यांच्या हाती 'मशाल'

उद्धव ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल चिन्ह मिळाले आहे. शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे. दोन्ही गटांच्या वतीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आज निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावाची कागदपत्रे सादर केली होती. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

दोन्ही गटांच्या नावावर आणखी एक पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना 'मशाल' हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल चिन्हाची मागणी केली होती. ते धार्मिक प्रतीक असल्याने ते देता येत नाही. तसेच, उगवता सूर्य हे तामिळनाडूमध्ये पक्षाचे चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला तीन नवीन चिन्हे देण्याची सूचना करण्यात आली. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in