Uddhav Thackeray: नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका ; म्हणाले, "त्यांचं नाव घेतल्यावर जेवण..."

राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे
Uddhav Thackeray: नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका ; म्हणाले, "त्यांचं नाव घेतल्यावर जेवण..."

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. ठाकरे आताच्या सरकारला अनेक गोष्टींबाबत विचारणा करतात, पण त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात काय काम केलं ते सांगावं. ठाकरे यांचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही, अशी खोचक टीका राणे यांनी केली.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकेर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं? त्यांनी अडीच वर्षात काय पराक्रम करुन दाखवला? किती पर कॅपिटल उत्पन्न वाढवलं? किती जीडीपी वाढवली? किती रोजगार निर्मीती केली? गरिबीचं प्रमाण किती कमी केलं? किती कुपोषितपणा कमी केला? अशा एक ना अनेक प्रश्नाची भडीमार राणे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना हे असले विषय कळणार देखील नाहीत. त्यांना काहीही माहिती नाही. खोके आणि ठोके याच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही. ठाकरे यांचं नाव घेतल्यावर मला जेवण सुद्धा जात नाही, अशी बोचरी टीका त्यांना केली.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद हा जगजाहीर आहे. राणे पिता-पुत्र हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. काहीवेळी त्यांची टीका ही गंभीर असते. काही वेळा मात्र त्यांच्या भाषेचा स्तर देखील घासरतो. अनेकदा राणे हे उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमक होऊन टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख देखील करताता. अशात राणे यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in