उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौऱ्यावर

दोन दिवसांत उद्धव ठाकरे सात जनसंवाद सभा घेणार आहेत.
उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौऱ्यावर
(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी/मुंबई

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारपासून बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात दोन दिवसात ते सात जनसंवाद सभा घेणार घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष यंत्रणा कार्यरत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक दौरे सुरू केले आहेत. कोकणातील दौरा यशस्वी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला मोर्चा आता विदर्भ, मराठवाड्याकडे वळवला आहे. त्यानुसार ठाकरे हे आज, गुरुवारी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते चिखली, मोताळा आणि जळगाव -जामोद येथे जनसंवाद सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे शुक्रवारी बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते खामगाव, मेहकर, सेनगाव आणि कळमनुरी येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. बुलढाणा आणि हिंगोलीचे खासदार शिंदे गटात आहेत. त्यामुळे बुलढाणा आणि हिंगोली दौऱ्यात ठाकरे हे बंडखोर खासदारांचा समाचार घेण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in