
मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी मुंबईत एका विवाह समारंभाच्या निमित्ताने एकत्र आले.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे त्यांचे भाचे यश देशपांडे यांच्या विवाहात रविवारी सहकुटुंब दादरमध्ये उपस्थित राहिले.
यश हे राज ठाकरे यांची मोठी बहिणी जयवंती देशपांडे यांचे पुत्र आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या माहेरच्यांकडूनही जवळचे नातेवाईक आहेत. उद्धव व रश्मी यांची ओळख जयवंती यांच्यामुळेच झाली. व पुढे उद्धव व रश्मी यांचा विवाह झाला.
ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यादेखील या विवाह समारंभास उपस्थित होत्या.
राज ठाकरे हे गेल्या आठवड्यात रश्मी ठाकरे यांचा भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या विवाहालाही उपस्थित होते. मात्र उद्धव येण्याच्या आधीच राज हे तेथून निघून गेले होते.