उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

सामान्य माणसे, काही रिक्षावाले, काही टपरीवाले शिवसेनाप्रमुखांनी या सर्वांना आमदार, खासदार, मंत्री केले, पण...
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काहीच वेळात फेसबुक लाइव्ह येत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शेलक्या शब्दात सर्वांचा समाचार घेत आपल्या पदाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाचा आढावा त्यांनी जनतेसमोर दिला. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे आभार त्यांनी मानले.

सामान्य माणसे, काही रिक्षावाले, काही टपरीवाले शिवसेनाप्रमुखांनी या सर्वांना आमदार, खासदार, मंत्री केले, पण हे लोक मोठे झाल्यावर अस्वस्थ झाले. ज्यांना सर्व काही दिले ते नाराज होते... पण ज्यांना काही दिले नाही ते त्यांच्यासोबत राहिले, ते शिवसैनिक आहेत असेही त्यांनी बोलून दाखवले. केंद्रीय राखीव दल उद्या मुंबईत पोहोचेल उद्या एकही शिवसैनिकांनी त्यांच्यामध्ये येऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in