उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मालेगावात उर्दूमध्ये बॅनरबाजी; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अली जनाब त्यांना..."

आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत, अशामध्ये त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी उर्दू भाषेमध्ये फलक झळकवण्यात आले
उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मालेगावात उर्दूमध्ये बॅनरबाजी; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अली जनाब त्यांना..."

आज मालेगावमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेत आहेत. अशामध्ये अनेकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उर्दू भाषेत फलक झळकावण्यात आले आहेत. यावरून आता भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अली जनाब वगैरे उद्धव ठाकरेंना आता भूषणावह वाटते का?" असा सवाल करत टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अली-जनाब वगैरे उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटते का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेत कोणी काही म्हटले, तर आम्हाला काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर उद्धव ठाकरे लांगुलचालन करत असतील, तर त्यांना याचे उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना द्यावे लागेल." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये जाहीर सभा आहे. मालेगावात अनेकठिकाणी सभेचे फलक लागले आहेत. मुस्लीमबहूल भागात काही ठिकाणी लागलेले फलक हे उर्दू भाषेत आहेत. यावरून आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका सुरू आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने या फलकावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

logo
marathi.freepressjournal.in