उद्धव ठाकरेंची सहकुटुंब काळाराम मंदिरात महाआरती; बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले -उद्धव ठाकरे

अयोध्येत एका बाजूला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले होते.
उद्धव ठाकरेंची सहकुटुंब काळाराम मंदिरात महाआरती; बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले -उद्धव ठाकरे

नाशिक : एकीकडे अयोध्येत प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होत असताना त्याच मुहूर्तावर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊन सहकुटुंब महाआरती केली.

यावेळी उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील रुद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. गळ्यात बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे रुद्राक्षांच्या माळा घालूनच ते श्रीराम दर्शनाला सहकुटुंब नाशिकात अवतरले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे सुद्धा होते. यावेळी नाशिकच्या पंचवटी भागात मोठ्या प्रमाणात उबाठा सेनेचे कार्यकर्ते जमा झाले होते. प्रशासनातर्फे कडक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाकडून नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे पोहचले होते. त्याठिकाणी पूजा करून महाआरतीही केली. नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबाने प्रभू श्रीरामांची आरती केली. तसेच आपल्या देशात महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी प्रभू श्रीरामांचरणी नतमस्तक होऊन उद्धव ठाकरेंनी साकडे घातल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या या श्रीराम दर्शनावर टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की "जे लोक रामाचे नाहीत, ते कामाचे नाहीत. ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो. काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. सर्वांनी या सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे. पण काही लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, ‘जो राम के नहीं, वो काम के नहीं’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील “ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?” असा खोचक सवाल केला आहे.

अयोध्येत एका बाजूला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले होते. मात्र त्यांनी तिथे न जाता नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. पण एक्सवरून ठाकरे गटाने अखेर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक्सवरूनच प्रतिक्रिया देताना आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी सुखावली, जय श्रीराम, असे म्हटले आहे.

अयोध्येत मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण जगाने तो पाहिला. यावर ठाकरे गटाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, अखेर बाळासाहेबांचे स्वप्‍न पूर्ण झाले आहे. रामजन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा अभिमान आहे. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले. सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचे आणि बलिदानाचे सोने झाले. प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो, असे म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आनंद व्यक्त केला असून, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली, असे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in