शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याचे नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तूळात चर्चांना उधान आलं आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद सांधला. यावेली बोलताना त्यांनी काल बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. देशप्रेमी पक्षांच्या स्थापन झालेल्या आघाडीला इंडिया असं शॉर्टनाव देण्यात आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी ही आघाडी कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाविरुद्ध नसून हुकूमशाही विरुद्ध आहे. असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी अजित पवार यांच्या घेतलेल्या भेटीवर देखील ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्यासाठी चांगले काम करा. सध्या राज्यात जी काही साठमारी सुरु आहे. त्यामुळे राज्यातील प्रश्न पावसामुळे सर्वत्र पाणी भरत आहे. या साठमारीमुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होई देऊ नका, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.
अजित पवारांनी अडीच वर्षे माझ्यासोबत काम केलं असल्याने मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. बाकीच्यांचे सत्तेसाठी डावपेच सुरु असले तरी त्यांच्यामुळे लोकांना वेळेवर मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोऱ्या पुन्हा त्यांच्याकडे आल्या आहेत. असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर ज्या अजित पवारांमुळे शिवसेनेचा एक गट गुवाहाटीला गेला, तेच अजित पवार आता सत्तेत आहेत.मग खरं कोण आणि खोटं कोण हे समजायला जनता मुर्ख नाही, असं देखील ते म्हणाले.