"सत्ता येऊ द्या, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो", उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

भाजपकडे कार्यकर्तेच नाहीत. माझ्याकडे मर्द शिवसैनिक आहेत, जे शिवसेनाप्रमुखांनी दिलेत. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. मी वारसा घेऊन पूढे चाललो आहे. पण, भाजपकडे असा कोणीही कार्यकर्ता नाही, दंगल झाली की आतामधे शेपूट घालून पळणारी ही अवलाद असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
"सत्ता येऊ द्या, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो", उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. या अधिवेशनाची सांगता शहरातील गोल्फ मैदानातील जाहीर सभेने झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला. भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. फक्त 'भेकड'च नाही, तर 'भाकड' देखील आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सत्ता येऊ द्या, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो-

भाजपकडे कार्यकर्तेच नाहीत. माझ्याकडे मर्द शिवसैनिक आहेत, जे शिवसेनाप्रमुखांनी दिलेत. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. मी वारसा घेऊन पूढे चाललो आहे. पण, भाजपकडे असा कोणीही कार्यकर्ता नाही, दंगल झाली की आतामधे शेपूट घालून पळणारी ही अवलाद आहे. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स हे यांचे घरगडी धाडी टाकतात. घर माझ्या कार्यकर्त्यांच्या अन् पाय ताणून बसतात हे नालायक. येऊ द्या आमची सत्ता, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही पहा, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना यावेळी दिला.

योगीजी आता स्वतःला सांभाळा-

"मी मोदींचा विरोधक नाही, आजही त्यांना मी नरेंद्र भाई म्हणतो, त्यावेळी माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. ते मी लपवत नाही. भाजपची नीती बरोबर नाही. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न करण्यात आले. तुम्हाला विरोधक, नको मित्र पक्ष नको, पक्षातील नेते नको. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग यांना फेकले, देवेंद्र फडणवीस यांना फेकले, मिंधेंना फेकले", असे म्हणत आता योगीजी तुम्ही स्वतःला सांभाळा. त्यांना जो जो प्रतिस्पर्धी वाटतो त्याला फेकतात, निवडणूकीनंतर असे एखादे प्रकरण काढतील तेव्हा योगींनादेखील फेकतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेला योगदान विचारण्यापर्यंत मजल गेली-

आम्ही कुठे राम मंदिराला विरोध करतो अशातला भाग नाही, तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केले होते. ते त्यावेळी शेंबड्या वयात असणाऱ्यांना माहितीही नसले. आता त्यांची शिवसेनेचे योगदान विचारण्यापर्यंत मजल गेली. त्यावेळी इतर कोणीही बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घेतली होती. अनेक नेत्यांनी पळपुटी भूमिका घेतली. धर्माची शिकवण देण्याऱ्या शंकराचार्यांना भेटण्याची तसदी नाही. रामनवमी पर्यंत का थांबले नाही, एवढी घाई का झाली, असा सवाल त्यांनी करत, अटल बिहारी वाजपेयी यांना केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा बाळासाहेब मदत केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

भाजपात भ्रष्टाचार्यांना मान-

सनातन धर्मावर कोणी बोलल्यावर भाजपचे नेते आगपखाड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील काही शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही असे, म्हणावे लागेल अशा शब्दांत त्यांनी भाजपचे वाभाडे काढले.

भाजपला रामाची मदत घ्यावी लागत आहे. राम नवमीच्या आधी निवडणूक तारीख लावतात. हनुमान, रामाच्या नावावर मत मागतात. मग 10 वर्ष काय केले, देशाला काय दिले घंटा, असा सवाल त्यांनी भाजपला केला.

...तेव्हा तुम्हाला पाठिंबा दिलाच होता-

राममंदिर बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. काश्मीरमधील 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदुंवर अत्याचार होत असताना सुद्धा हिंदुंच रक्षण होण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता, असे ते भाजपला उद्देशून म्हणाले.

राहुल नार्वेकरांना पुन्हा आव्हान-

छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात. महाराष्ट्राच्या हक्काचे वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही, असे म्हणत, जा त्या नार्वेकरांना सांगा हिंमत असेल तर इकडे मध्ये येऊन सांग शिवसेना कुणाची?, असे आव्हान त्यांनी पुन्हा राहुल नार्वेकर यांना दिले.

logo
marathi.freepressjournal.in