भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले

अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले
Published on

नाशिक : अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री झाली आहे.

सरकारची बाजू मांडण्यासाठी या हाय-प्रोफाइल खटल्यात राज्य शासनाने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

खरात विरोधात गंभीर गुन्हे दाखल

स्वतःला सिद्धपुरुष आणि अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणारा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. दैवी शक्तीची भीती दाखवून, गुंगीचे औषध देऊन आणि प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पेढा किंवा पाण्यातून अंमली पदार्थ देऊन तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा. याप्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली असून, या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून याचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. खरातविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, 'महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा' अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे

'एसआयटी'ने या प्रकरणाचा सखोल तपास करताना आरोपी अशोक खरात याच्या कार्यालय आणि फार्म हाऊसची कसून झडती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले आहेत.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले
भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी

खरातचे अनेक बड्या उच्च पदस्थांशी संबंध

अशोक खरात याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी आणि मंत्रालयातील उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता हा खटला थेट ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे गेला आहे. अनेक कठीण खटल्यांमध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळवून देणारे उज्ज्वल निकम आता न्यायालयात सरकारची बाजू मांडणार असल्यामुळे राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in