१० जिल्ह्यांत उमेद मॉल उभारणार; २०० कोटींचा निधी मंजूर

राज्यातील महिला बचत गटांना उत्पादन विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यात राज्यातील १० जिल्ह्यांत उमेद माॅल (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यात येणार असून यासाठी २०० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
Maharashtra government Maratha promise
Maharashtra government Maratha promise
Published on

मुंबई : राज्यातील महिला बचत गटांना उत्पादन विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यात राज्यातील १० जिल्ह्यांत उमेद माॅल (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यात येणार असून यासाठी २०० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये हे मॉल कार्यान्वित करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने ही योजना इतर जिल्ह्यात विस्तारली जाणार आहे. प्रत्येक उमेद मॉलसाठी कमाल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, हे मॉल जिल्हा परिषदेच्या जमिनीवर उभारण्यात येतील. मॉलमध्ये प्रत्येक गटाला चक्राकार पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जातील. महिलांना संवाद आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा देखील असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in