Video : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात विनापरवाना डेकोरेशन; TTE निलंबित

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्यात एका जोडप्यासाठी विनापरवाना डेकोरेटरला प्रवेश देऊन कूप सजवण्याची परवानगी देणे एका रेल्वे तिकीट परीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे.
रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात विनापरवाना डेकोरेशन; TTE निलंबित
रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात विनापरवाना डेकोरेशन; TTE निलंबित(X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
Published on

छत्रपती संभाजीनगर : नंदीग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्यात एका जोडप्यासाठी विनापरवाना डेकोरेटरला प्रवेश देऊन कूप सजवण्याची परवानगी देणे एका रेल्वे तिकीट परीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित केले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ६ जुलै रोजी नंदीग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कूपमधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने प्रवासादरम्यान आपला डबा सजवण्यासाठी एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे डेकोरेटरची सेवा घेतली होती. दरम्यान, या सजवलेल्या रेल्वे डब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेकोरेटरला रेल्वे डब्यात प्रवेश देणे पूर्णपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर होते, जी सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर चूक आहे. या निष्काळजीपणाबद्दल संबंधित तिकीट तपासनीसाला (टीटीई) तत्काळ निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in