अन्न पदार्थांची अनधिकृत विक्री करणारे दोघे ताब्यात

पूर्णा येथील दोन अल्पवयीन रहिवाशांना पूर्णा रेल्वे स्थानकावर अनधिकृतपणे अन्न पदार्थ विक्री केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
अन्न पदार्थांची अनधिकृत विक्री करणारे दोघे ताब्यात
Published on

नांदेड : पूर्णा येथील दोन अल्पवयीन रहिवाशांना पूर्णा रेल्वे स्थानकावर अनधिकृतपणे अन्न पदार्थ विक्री केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने विविध गाड्यांमध्ये पँट्री कारद्वारे आणि स्थानकांवर खाद्य पदार्थांचे स्टॉल/कॅन्टीन रेल्वेने उपलब्ध करून दिले. कँटरिंग कंत्राटदार स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये अन्न पदार्थ विक्रीसाठी स्थानिक लोकांना कामावर ठेवू शकतात/गुंतवू शकतात. विक्रेत्याचे किमान वय १८ वर्षे असणे बंधनकारक आहे, बालकामगारांना कधीही प्रोत्साहन देत नाही, असे रेल्वे खात्याचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in