सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक हातोडा घेऊन शेकडो कार्यकर्ते दापोलीत दाखल

परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी, या मागणीसाठी सोमय्या दापोलीत दाखल
File Photo
File PhotoANI

माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांची दापोलीतील जमीन खरेदी आणि रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी पैसा कुठून आला ? असा सवाल विरोधक करत आहेत. परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी, या मागणीसाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता अनिल परबांचे रिसॉर्ट पाडले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक हातोडा घेऊन शेकडो कार्यकर्ते दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्ट चा नारा दिला जात आहे. हे रिसॉर्ट पाडले नाही, तर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना आज ना उद्या कारागृहात जावे लागेलच, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आता ही फाइल पर्यावरण मंत्रालयाकडे आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ते आदेश देणार आहेत. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या रिसॉर्टच्या बांधकामात काळा पैसा वापरण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. पर्यावरण, भारत सरकारने 31 जानेवारी 2022 रोजी हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 90 दिवसांच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, 90 दिवस उलटून गेले तरीही रिसॉर्ट पाडण्यात आलेले नाही. यापूर्वी दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची ईडीने चौकशी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in