उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे वाटोळे झाले; महायुतीच्या मेळाव्यात आ. प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

या मेळाव्यात बोलताना दरेकर म्हणाले की, अकोला जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे. ऐतिहासिक वारसा आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे वाटोळे झाले; महायुतीच्या मेळाव्यात आ. प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

अकोला : गेली अनेक वर्ष आपले राज्य मागे गेले आहे. उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे झाले. महाराष्ट्र ठप्प होता, असा जोरदार हल्लाबोल भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी अकोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात केला. तसेच आपल्याला या देशासाठी काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला कर्तव्यदक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका पार पडायची आहे, असे आवाहनही दरेकरांनी यावेळी केले.

या मेळाव्यात बोलताना दरेकर म्हणाले की, अकोला जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे. ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याचे वेगळे स्थान आहे. अकोल्यातील या मेळाव्याकडे आज सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. परंतु आपल्याला या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला, अकोल्यातील जनतेला सांगू इच्छितो की आता राजकारणाची दिशा बदलली आहे. जे लोकांना, नवीन पिढीला हवे ते जर राजकारण्यांनी दिले नाही तर जनता आपल्या सोबत राहत नाही. नवीन पिढीला विकासाची भाषा कळते. जुन्या पिढीसारखे जाती पातीचे राजकारण नवीन पिढीला नकोय. विकासाची भूमिका घेणारे राजकारण हवे आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाचे राजकारण दाखवले. विकासावर राजकारण करून निवडणुका जिंकता येतात हे मोदींनी देशाला दाखवून दिले आहे.

दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून जायला त्यांना काही वाटले नाही. एकनाथ शिंदे सत्तेत मंत्री होते, नगरविकास मंत्री होते. सत्ता सोडण्याची त्यांना गरज नव्हती. अजित पवार तर उपमुख्यमंत्री होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. या तिन्ही नेत्यांनी ठरवले या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहायचे ठरवले असेल तर आम्ही सगळ्या भिंती तोडून विकासाच्या बाजूने आणि विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले पाहिजे ही भूमिका घेऊन महायुती निर्माण झाली.या मेळाव्याला भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी, माजी आ. गोपीकिशन बजोरिया, कृष्णा अंधारे, तुकाराम बिडकर, विजय देशमुख, अश्विन नवले विजय अग्रवाल, अनिल धोत्रे यांसह महायुतीतील १५ घटक पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एक संवेदनशील कार्यकर्ता, नेता म्हणून महाराष्ट्र त्यांना पाहतो. प्रचंड मेहनती, कष्ट करणारा नेता आहे. दुसऱ्या बाजूला आमचे नेते देवेंद्र फडणवीस पाच वर्षे या राज्याचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर राज्य कारभार कसा करावा, विकास काय असतो ही दृष्टी त्यांनी महाराष्ट्राला दाखवली. असे अभ्यासू आमचे नेतृत्व आहे. अजित पवार यांचीही प्रशासनावर पकड आणि जरब आहे. म्हणजे तिन्ही क्वालिटीचे तीन नेते एकत्र झाल्यावर महाविकास आघाडीची आपल्यासमोर डाळ शिजेल का? असा सवाल करत दरेकर म्हणाले की, तीन बलाढ्य नेते आज एकत्र आहेत.

प्रवीण दरेकर, भाजप विधानपरिषद गटनेते

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in