केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज नरसी येथे जाहीर सभा

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुरुवारी येथे होणाऱ्या सभेची माहिती देण्यासाठी ते नांदेड येथे आले होते. पाठक म्हणाले, २०१४ साली झालेल्या निवडणुकीत प्रचारासाठी अमित शहा हे नांदेडमध्ये आले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज नरसी येथे जाहीर सभा

नांदेड : भाजप महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी (दि. ११) नांदेड जिल्ह्यातील नरसी (ता. नायगाव) येथे सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शहा यांची ही महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेडमध्ये होत आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत, असे भाजप समन्वयक विश्वास पाठक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुरुवारी येथे होणाऱ्या सभेची माहिती देण्यासाठी ते नांदेड येथे आले होते. पाठक म्हणाले, २०१४ साली झालेल्या निवडणुकीत प्रचारासाठी अमित शहा हे नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी भोकर येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आता तब्बल १० वर्षानंतर अमित शहा हे नांदेडमध्ये येत आहेत. या सभेसाठी १ लाख ३० हजार चौरस फूट मंडप टाकण्यात आला असून, सुमारे ४० हजार नागरिकांची उपस्थिती यावेळी असणार आहे. असे विश्वास पाठक यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले आणि दिलीप ठाकूर यांची उपस्थिती होती.

logo
marathi.freepressjournal.in