नितीन गडकरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठा विकास होईल, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वगुरू बनवून एक आनंदी आणि भरभराट झालेला देश म्हणून उदयास आणावयाचे आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. केंद्रात पुन्हा रालोआचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू पारवे यांनीही यावेळी आपला उमेदवारी अर्ज भरला.

गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी हे शहरातील ‘रोड शो’मध्ये सहभागी झाले. जनतेच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा रालोआचे सरकार केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास गडकरी यांनी जनतेला संबोधताना व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठा विकास होईल, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वगुरू बनवून एक आनंदी आणि भरभराट झालेला देश म्हणून उदयास आणावयाचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

५ लाखांच्या मताधिक्क्याने विजय हवा!

आपण नागपूरमध्ये एक लाख कोटी रुपयांची कामे केली आणि त्याचे सर्व श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहे, आपण मिहानला चालना दिली आणि त्याद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी रस्ते आणि पूल बांधले, असेही ते म्हणाले. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, नागपूरमध्ये किमान ७५ टक्के मतदान झाले पाहिजे आणि आपण पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी झालो पाहिजे, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in