टीआरपी चांगला आहे, त्यामुळेच जास्त देणग्या मिळतात; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

विरोधकांना कमकुवत करण्यासाठी मोदी सरकार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांना शस्त्र बनवत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. भाजपच्या प्रतिस्पर्ध्यांनी जनतेचा विश्वास जिंकून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करावा, असे नितीन गडकरी म्हणाले.
टीआरपी चांगला आहे, त्यामुळेच जास्त देणग्या मिळतात; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

नागपूर : टेलिव्हिजन माध्यमामध्ये ज्यांचा टीआरपी जास्त आहे, त्यांना जाहिरातीत चांगला दर मिळतो. ज्यांचा टीआरपी कमी आहे, त्यांना कमी दरात जाहिराती मिळतात. आज आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला जास्त देणग्या मिळाल्या. उद्या जर इतर कोणत्याही पक्षाला सत्तेत आल्यास आणखी देणग्या मिळतील, असे भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रदीर्घ मुलाखतीत इलेक्ट्रोल बॉण्डसंबंधात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आमचा टीआरपी चांगला आहे, त्यामुळेच जास्त देणग्या मिळाल्या, असे त्यांनी सांगितले. निवडणुकांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३७० जागांच्या उद्दिष्टावर विश्वास ठेवत त्या संबंधात भाजप नेते नितीन गडकरी यांनी सांगितले की, सध्याची आमच्या २८८ इतके असणारे जागांचे बळ लक्षात घेता त्यापेक्षा अधिक जागांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात वाढीव जागा मिळतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या ३७० जागा जिंकण्याच्या लक्ष्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करत गडकरी म्हणाले की, आगामी निवडणुकीत दक्षिण भारतातून पक्षाचे लक्ष्य गाठले जाईल. तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आम्ही मेहनत घेतली, त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येतील, असे त्यांनी सांगितले. रालोआ यावेळी ४०० जागांचा आकडा पार करेल याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही. गेल्या १० वर्षात सरकारने केलेल्या कामांमुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

विरोधकांवर हल्लाबोल

विरोधकांना कमकुवत करण्यासाठी मोदी सरकार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांना शस्त्र बनवत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. भाजपच्या प्रतिस्पर्ध्यांनी जनतेचा विश्वास जिंकून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. गडकरी म्हणाले, “विरोधकांना कमकुवत करणे की बळकट करणे ही आपली जबाबदारी आहे का? जेव्हा आमच्याकडे फक्त दोन खासदार होते आणि आम्ही कमकुवत होतो तेव्हा आम्हाला सहानुभूती म्हणून कोणतेही पॅकेज मिळाले नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

कार्यकर्त्यांची ताकद हीच खरी शक्ती

कार्यकर्त्यांची ताकद हीच आपली खरी ताकद आहे. गडकरी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मजबूत झाला असून विरोधकांनाही जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in