धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता बाळगून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणीसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता बाळगून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

संतोष देशमुख हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी शनिवारी मुंबईच्या आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबासोबत चर्चा केली. या भेटीनंतर आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, या खटल्यातील जवळजवळ सगळे आरोपी पकडले आहेत. आंधळे नावाचा आरोपी अजून फरार आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता या प्रकरणात कोणताही आरोपी सुटणार नाही, त्यांना फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे. कोणताही आरोपी सुटणार नाही या दृष्टिकोनातून पोलिसांनी ही केस बनवली आहे. आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका माझी आहे, मी त्यांच्यासमोर हीच भूमिका मांडली आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.

मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय आहे. वाल्मिक कराड याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, ही गोष्ट खरी आहे. पण खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध दिसत नाही. ‘परंतु नैतिकतेच्या आधारे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर ठीक आहे,’ पण मला वाटतं राजीनाम्याची मागणी ही राजकीय आहे. या संदर्भात काय करायचं हा निर्णय अजित पवार आणि धनंजय मुंडे घेतील, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in