पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना मतदानाचे आवाहन

मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह १३ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या शुभमुहूर्तावर होणार आहे.
 पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना मतदानाचे आवाहन
Published on

पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. मतदान करण्यासाठी आणि मतदानात वाढ व्हावी यासाठी शासनपातळीवर आणि सामाजिक संघटनांकडून विविध माध्यमातून जनजागृती करणे सुरू आहे. अशातच पुण्यामध्ये सध्या एक विवाह निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे.

१३ मे च्या पुणे लोकसभेच्या मतदानाला येण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका आहे. मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. ही पत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. १३ मे च्या लग्नासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण दिले गेले आहे. चि. मतदार आणि चि. सौ. का. लोकशाही यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. १३ मे च्या पुणे लोकसभेच्या मतदानाला येण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका आहे.

मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह १३ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या शुभमुहूर्तावर होणार आहे.

लोकसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक, एक मतदानरुपी आशीर्वाद देऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, हे अगत्याचे निमंत्रण दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in