Unseasonal rain: राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

राज्यात मुंबईसह पुणे, ठाणे, कल्याण तसंच अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी
Unseasonal rain: राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

राज्यात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचं हे संकट आणखी पुढच्या चार दिवस कायम राहणार असल्याची इशारा वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यात मुंबईसह पुणे, ठाणे, कल्याण तसंच अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर पुढील चार दिवसांत ठाणे, मुंबई, पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्याता आला आहे. दरम्यान हवामान खात्याने काही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने मुंबईत यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यासाठी देखील यलो अलर्ट जारी केला आहे. तर येणाऱ्या २४ तासात पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in