अवकाळी पावसाचा द्राक्षाला फटका; गहू, कांदा, मका, सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर बुधवारी व गुरुवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लाव द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे उत्पादक आणि शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले तर गहू व कांदा, मका, सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा द्राक्षाला फटका; गहू, कांदा, मका, सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान
Published on

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर बुधवारी व गुरुवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लाव द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे उत्पादक आणि शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले तर गहू व कांदा, मका, सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अगोदर दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांची गळ होण्याच्या भीतीमुळे उत्पादक, शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवकाळी पावसामुळे टोपणातील व फुलाऱ्यातील द्राक्ष बागांना मोठा धोका निर्माण झाला असून भरणीजोगा पाऊस झाल्याने द्राक्ष पिकाला फवारणी करणे जिकरीचे बनले आहे. सध्या स्थितीत द्राक्ष बागा वेगवेगळ्या स्टेजमध्ये असून शेवटच्या टप्प्यातील द्राक्ष बागांचे नुकतेच फेलफूट काढण्यात आले आहे, तसेच काळी जातीच्या द्राक्ष बागात पाणी उतरण्याच्या स्थितीत आहे. टोपणातील व फुलाऱ्यातील द्राक्ष बागांना सर्वात जास्त धोका असून जोरदार पावसामुळे

द्राक्ष बागाची गळ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.द्राक्ष हंगामाचे काम अंतिम टप्प्यात आले असून अगदी एक ते दीड महिन्यात पीक हातात येणार आणि अवकाळी पावसाने त्यावर घाला घातल्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या स्थितीला वेगवेगळ्या स्टेजच्या द्राक्षबागा असून सर्वच स्टेजच्या द्राक्षबागांना बेमोसमी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे महागडी औषधे फवारणी करावयास लागत असून खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मात्र द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नियमितपणे द्राक्ष स्टेट बघून द्राक्ष पिकांना फवारणी करणे गरजेचे आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच अवकाळी पावसामुळे गहू पिकाची पेरणी केली जात असून त्यांना पाणी भरण्याचे काम सुरू होते, मात्र जोरदार अवकाळी पावसामुळे गव्हाचे बीज दडपले जाण्याची शक्यता असून त्यामुळे गहू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा बियाणे उगवत असून कवळ्या रोपाला जोरदार पावसाचा फटका बसला आहे. बेमोसमी पाऊस रब्बी पिकांसाठी पुढे पोषक असला तरी आज मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.अचानक आलेल्या पावसामुळे शेतात उघड्यावर असलेल्या सोयाबीन व मका पिकांना धोका निर्माण झाला आहे.

- कैलास भोसले, (अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, महाराष्ट्र)

logo
marathi.freepressjournal.in