राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना ई-रक्त कोष या वेबसाईटवर दररोज रक्त संकलनाची अद्ययावत माहिती अपडेट करण्याच्या निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही सूचना देण्यात आली आहे. त्याअंतर्गत या सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्य लोकांना रक्तपेढ्यांमधील रक्तगटांच्या साठ्याची माहिती मिळू शकणार आहे.
राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना सूचना देऊनही अनेक रक्तपेढ्या ई- रक्त कोषवर रक्ताशी संबंधित अद्ययावत माहिती भरत नाहीत. याबाबत आरोग्य मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. एसबीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गेल्या महिन्यात सर्व राज्यांच्या आरोग्य विभागांना एक परिपत्रक जारी केले होते ज्यात रक्त संकलनापासून साठा आयात आणि निर्यात करण्याची ई-रक्त कोषवर संकलनाची वास्तविक-वेळ माहिती अद्यतनित करण्याचे निर्देश दिले होते.
राज्यात ३७० रक्तपेढ्या
सूचना देऊनही अनेक रक्तपेढ्या वेळोवेळी ई-रक्त कोषवर रक्तासंबंधित माहिती अपडेट करत नसल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात ३७० रक्तपेढ्या असून, सर्व रक्तपेढ्या रक्ताच्या साठ्याशी संबंधित माहिती अद्ययावत करत असतात. ते म्हणाले की केंद्राकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर, पुन्हा एकदा एसबीटीसीने सर्व रक्तपेढ्यांची रिअल टाइम माहिती वेळोवेळी अपडेट करावी, अशा सूचना दिल्या आहेत.