UPSC 2027 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर

UPSC Exam Calendar Released: केंद्रीय लोकसेवा आयोगाने वर्ष २०२७ साठीचे अधिकृत परीक्षा कॅलेंडर जाहीर केले असून, त्यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस, एनडीए, सीडीएस, अभियांत्रिकी सेवा, सीएपीएफ यांसह तब्बल २७ परीक्षा आणि भरती प्रक्रियांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
UPSC 2027 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर
Published on

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने वर्ष २०२७ साठीचे अधिकृत परीक्षा कॅलेंडर जाहीर केले असून, त्यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस, एनडीए, सीडीएस, अभियांत्रिकी सेवा, सीएपीएफ यांसह तब्बल २७ परीक्षा आणि भरती प्रक्रियांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या कॅलेंडरमुळे लाखो उमेदवारांना तयारीचे नियोजन करण्यास मोठी मदत होणार आहे. आयोगाने परीक्षा, नोटिफिकेशन, अर्जाची अंतिम तारीख आणि मुख्य परीक्षांचे वेळापत्रक एकाच वेळापत्रकात प्रसिद्ध केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार, नागरी सेवा परीक्षा, एनडीए, सीडीएस, अभियांत्रिकी सेवा, सीएपीएफ आणि संयुक्त भू-वैज्ञानिक यांसारख्या प्रमुख परीक्षांच्या तारखा स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

आयोगाच्या कॅलेंडरनुसार संयुक्त भू-वैज्ञानिक पूर्वपरीक्षा १० जानेवारी २०२७ रोजी होणार असून, १३ जानेवारीला यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२७ चे अधिकृत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. तसेच ३१ जानेवारीला अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा होणार असून, यूपीएससी सीएसईसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ फेब्रुवारी २०२७ निश्चित करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित एनडीए आणि एनए परीक्षा (१) आणि सीडीएस परीक्षा (१) या दोन्ही परीक्षा ११ एप्रिल २०२७ रोजी होणार आहेत.

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२७ ही २३ मे २०२७ रोजी पार पडणार असून, त्यानंतर २० ऑगस्ट २०२७ पासून मुख्य परीक्षा सुरू होणार आहे. केंद्रीय सुरक्षा दलांमधील अधिकारी पदांसाठीची सीएपीएफ परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in