तुर्तास एसटी आंदोलन स्थगित ; मंत्री उदय सामंत गुणरत्न सदावर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा

शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही तुर्तास एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करत आहोत- गुणरत्न सदावर्ते
तुर्तास एसटी आंदोलन स्थगित ; मंत्री उदय सामंत गुणरत्न सदावर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा

दिवाळीत एसटी विनाअडथळा सुसाट धावणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या एसटी संप मागे घेण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सकारात्मक चर्चा पार पडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत महत्वाच्या चार मुद्यांवर चर्चा पार पडली. मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीतील निर्णयाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्यांना मदत करणे ही आमची भूमिका आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यासोबत या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यासोबत यासंदर्भात आयोजन

पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णय झाला

बोनस वाढला पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेऊन जाहिर करतील

आजपासून आंदोलन थांबवण्याचा निर्णय

२ हजार २०० नवीन गाड्या येणार

२०२५-२६ला २५०० बस येणार

येत्या चार वर्षात एसटीत नऊ हजार बसेस नव्याने दाखल होती.

दोन वर्षात अडीच हाजर ईव्ही गाड्या दाखल होतील

दरम्यान, सदावर्ते यांच्यासोबत एसटीसंदर्भात चर्चा झाली याचा अर्थ हा नाही की आरक्षणावर त्यांचे विचार आम्हाला मान्य आहे. आमचे सदावर्तेंबरोबर मतभेद कायम असतील. आम्हाला मराठा आरक्षण द्यायचं आहे. कुठेही फूट पडले असं आम्हाला वाटत नाही. कुणबी प्रमाणपत्र मिळाले तसेही आमचे प्रयत्न आहे. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असली तरी आम्हाला मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. असं उदय सामंत म्हणाले.

सदावर्ते काय म्हणाले

सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पंधरा दिवसात चर्चा होणार आहे. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही तुर्तास एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करत आहोत.

logo
marathi.freepressjournal.in