मुख्यमंत्र्यांच्या बोगस सही, शिक्क्याचा वापर; मरिन लाईन्स पोलिसांत तक्रार

कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्र्याच्या बोगस स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
मुख्यमंत्र्यांच्या बोगस सही, शिक्क्याचा वापर; मरिन लाईन्स पोलिसांत तक्रार

मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्र्याच्या बोगस स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा मरिन ड्राईव्ह पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली काही निवेदने आणि पत्रे पुढील कारवाईसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद करून ती ई-ऑफिस प्रणालीत नोंद केली जातात. त्यानंतर ते निवेदन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठविण्यात येतात. मात्र गेल्या काही दिवसांत कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बोगस स्वाक्षरी आणि तसेच शिक्के असल्याचे काही दस्तावेज सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.

हा प्रकार उघडकीस येताच याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत बोगस निवेदनाच्या काही प्रतीसह मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या अधिकाऱ्यांनी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रात्री उशिरा कार्यवाहीसाठी पाठविलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बोगस स्वाक्षरी, शिक्के मारल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा मरिन ड्राईव्ह पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. प्राथमिक तपासात आतापर्यंत १० ते १२ बोगस निवेदने पोलिसांना प्राप्त झाली आहेत. आणखीन काही निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बोगस स्वाक्षरी आणि शिक्के आहेत का, याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in