वाढवण बंदराचे काम जूनमध्ये सुरू; जेएनपीएचे चेअरमन उन्मेष वाघ यांची माहिती

स्वातंत्र्यानंतर त्यातील कराची आणि चितगांव ही बंदरे भारतातून गेली. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात भारताने बंदरांच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिल्याने आज आपली गरज भागवण्यासाठी पुरेशी बंदरे आपल्याकडे आहेत. मात्र, चीन ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायचे असल्यास भारतालाही मोठ्या क्षमतेच्या बंदरांचा विकास करावा लागेल.
वाढवण बंदराचे काम जूनमध्ये सुरू; जेएनपीएचे चेअरमन उन्मेष वाघ यांची माहिती

मुंबई : दमण आणि मुंबई यांच्या दरम्यान वसलेल्या वाढवण येथील प्रस्तावित बंदराचे काम येत्या जून महिन्यापासून सुरू होईल, अशी माहिती जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे (जेएनपीए) चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिली. या प्रकल्पासाठी लागणारे पर्यावरण आणि अन्य विषयातील परवाने मिळाले आहेत. सध्या निवडणुकीचा काळ असल्याने केवळ मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे. ती मिळाल्यानंतर येत्या जून महिन्यापासून वाढवण बंदराचे काम सुरू होईल, असे वाघ यांनी सांगितले.

दुसऱ्या महायुद्धानंतर जपान, आग्नेय आशियाई देश आणि चीन यांनी तीन टप्प्यांत वेगाने आर्थिक प्रगती केली. त्यांच्या या कामगिरीत बंदरांच्या विकासाचा वाटा बराच मोठा होता. भारतात स्वातंत्रयापूर्वी कराची, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि चितगांव ही महत्त्वाची बंदरे होती. स्वातंत्र्यानंतर त्यातील कराची आणि चितगांव ही बंदरे भारतातून गेली. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात भारताने बंदरांच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिल्याने आज आपली गरज भागवण्यासाठी पुरेशी बंदरे आपल्याकडे आहेत. मात्र, चीन ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायचे असल्यास भारतालाही मोठ्या क्षमतेच्या बंदरांचा विकास करावा लागेल. पूर्वीच्या मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी जेएनपीएची स्थापना झाली. आता भविष्यातील गरजांची पूर्तता करायची असल्यास आपल्याला आणखी एका मोठ्या बंदराची तातडीने आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई आणि दमण यांच्या दरम्यानची वाढवणची जागा अत्यंत सोयीची आहे, असे वाघ यांनी सांगितले.

वाढवण येथील बंदर जेएनपीएच्या तिप्पट क्षमतेचे असेल. तेथे २७ कंटेनर बर्थ असतील. शिवाय सिमेंट, पोलाद, एलएनजी यासह रोरो सेवा, तटरक्षक दल यांच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था असेल. वाढवण बंदरात सामानाची ने-आण करताना सह्याद्रीच्या डोंगररांगाचा फारसा अडथळा येणार नाही. वाढवण बंदरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचण्यविषयी शंका अनाठायी आहेत. तेथे तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही. तेथील खारफुटीच्या जंगलांना बाधा पोहोचणार नाही. तसेच स्थानिकांच्या रोजगार आणि पुनर्वसनाचीही योग्य काळजी घेण्यात आली आहे. तेथे राहणाऱ्या ५००० हून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण (मॅपिंग) पूर्ण झाले असून त्यांना भरपाई देण्याची तयारी करण्यात आली आहे.

काही मोजके पर्यावरणावादी कार्यकर्ते प्रकल्पाला अद्याप विरोध करत आहेत. पण त्यांच्या दाव्यात फारसे तथ्य नाही. आम्ही आजवर पर्यावरणासंबंधी २७ अभ्यास केले आहेत. पर्यावरणासंबंधी सर्व शंकांचे निरसन केले आहे. पर्यावरणवाद्यांनी आजवर एकही ठोस मुद्दा उपस्थित केलेला नाही. जेएनपीएतर्फे प्रकल्पाविषयी पुरवल्या जाणाऱ्या मराठी पत्रकांतील भाषांतर चांगले नाही, अशा फुटकळ बाबींवर पर्यावरणवादी भर देत आहेत. त्यांच्याकडे कोणताही भरीव मुद्दा नाही, असेही वाघ म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in