Vaibhavwadi : 'जनावर' समजून तरुणावर गोळीबार; एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात शिकारीदरम्यान झालेल्या निष्काळजी गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
Vaibhavwadi : 'जनावर' समजून तरुणावर गोळीबार; एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात शिकारीदरम्यान झालेल्या निष्काळजी गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाचे नाव सागर सुरेश पोटळे (२६) असे असून, कृष्णा सुरेश कातकर (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री आचिर्णे गावातील कालव्याजवळ हा प्रकार घडला.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण परिसरात असताना उंच भागावरून दबा धरून बसलेल्या एका शिकाऱ्याने सखल भागात हालचाल दिसल्याने ते रानटी जनावर असल्याचा समज करून गोळीबार केला. या गोळीबारात सागर पोटळे यांच्या चेहऱ्यावर व हातावर गोळ्या लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा कातकर यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in