Vaishnavi Hagawane Death Case: राजेंद्र, सुशील हगवणेला न्यायालयीन कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पिंपरी-चिंचवड न्यायालयाने वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर सहआरोपी निलेश चव्हाण याला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश
Vaishnavi Hagawane Death Case: राजेंद्र, सुशील हगवणेला न्यायालयीन कोठडी
Published on

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पिंपरी-चिंचवड न्यायालयाने वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर सहआरोपी निलेश चव्हाण याला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बावधन पोलिसांनी मंगळवारी या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले होते.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयासमोर केली होती. यावर सुनावणीअंती न्यायालयाने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयीन कोठडी, तर निलेश चव्हाणला पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकिलांनी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. निलेश चव्हाणकडून हगवणे कुटुंबाचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, निलेश आणि हगवणे कुटुंबातील सदस्यांमध्ये चॅटिंग झालेले आहे. तसेच, निलेश आणि हगवणे यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, वैष्णवीचे बाळसुद्धा निलेशकडे होते आणि त्याने त्या बाळाची हेळसांड केली का, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी नमूद केले. या मुद्यांवरून निलेशला किमान पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

निलेश चव्हाणच्या वकिलांनी मात्र, त्यांची सगळी चौकशी पूर्ण झाली असून, एकही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूबाबत अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. पंचनाम्यानुसार वैष्णवीचे वजन ७१ किलो होते. त्यामुळे ज्या पंख्याला गळफास घेतल्याचे म्हटले जात आहे, तो पंखा इतके वजन सहन करू शकतो का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वैष्णवीने गळफास घेतलेला पंखा आणि वापरलेली साडी या वस्तू फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. या अहवालातून या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासात आता या फॉरेन्सिक अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in