आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना बुधवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत "वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती" असा धक्कादायक दावा केला.
आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
Published on

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना बुधवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत "वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती" असा धक्कादायक दावा केला. तसेच, "तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडण्यात आले होते, ज्यात तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसून येते," असेही वकिलांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी वाढवली.

या प्रकरणात वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. या पाचही जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सरकारी वकिलांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करताना, फरार असलेला निलेश चव्हाण कुठे आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे.

तसेच, मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग असू शकते, त्याबाबत चौकशी करायची आहे. आरोपींनी हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने गहाण ठेवले आहे, त्याची माहिती घ्यायची बाकी आहे. याशिवाय, वैष्णवीला मारहाण करण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचे आहेत. मृत्यूवेळी वैष्णवीच्या अंगावर ३० खुणा होत्या, त्यातील १५ खुणा मृत्यूच्या एक दिवस आधीच्या आहेत.

आत्महत्येच्या एक दिवस आधी तिला कोण मारहाण करत होते, मारहाणीचा उद्देश काय होता आणि कोणत्या वस्तू वापरल्या गेल्या, याचा तपास करायचा असल्याचे न्यायालयात सांगितले.

चोंधे कुटुंबावर त्यांच्या सुनेने गंभीर आरोप

शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील न्यायालयीन घडामोडी सुरू असतानाच, या प्रकरणातील फरार आरोपींना मदत केल्याचा आरोप असलेल्या चोंधे कुटुंबावर त्यांच्या सुनेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडलेली असल्याने खळबळ उडाली आहे. पती सुयश चोंधे 'ब्लू फिल्म' दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली, तर सासू वैशाली चोंधे काळी जादू करत होती, असा आरोप धनश्री चोंधे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in